अहमदनगर : महिला पोलिसाच्या गळ्यावर चाकूने वार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरातील उपजिल्हा कारागृहाच्या स्वयंपाक घरातील चाकूने न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीस्त आरोपीने बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचार्‍यावर चाकू हल्ला केला. जिल्हा उपकारागृहात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पावलस कचरू गायकवाड या बंदी आरोपीने हा हल्ला केला. जखमी महिला पोलीस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी सुजाता निवृत्ती शेळके-हाडवळे (वय- 27) या जखमी झाल्या आहेत. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने हा हल्ला आरोपीने केला असल्याची माहिती समोर येत आहे.
सुजाता शेळके या कारागृहातील मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या सहकार्‍यांसोबत बंदोबस्ताला होत्या. न्यायाधीन बंदी आरोपी पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेतला. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने शेळके यांचे डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकूने वार केला. तो वार त्यांचे डाव्या हातावर झेलला असल्याने डाव्या हाताला दुखापत केली. कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

Post a Comment

Previous Post Next Post