एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महानगरपालिकेच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू आहे. सर्व क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छतेमध्ये भाग घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.
अहमदनगर शहरातील बऱ्याच भागात रस्त्याच्या कडेने गवत वाढलेले आहे. तसेच साईड पट्ट्या खराब झालेल्या आहेत. या साईड पट्ट्यांचे स्क्रीपींग करणे, रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत व काटेरी झाडे झुडपे काढावीत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची गॅग तयार करून मोहिम राबविणेत यावी, असे निर्देशही महापौर वाकळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहेत.
Post a Comment