अहमदनगर : शिर्डीमध्ये अतिरेक्याला कंठस्नान?


एएमसी मिरर वेब टीम  
शिर्डी : हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून आलेल्या एनएसजीच्या जवानांनी शिर्डी येथील सन अँड सॅण्ड या नामांकित हॉटेलवर दोरांच्या सहाय्याने उतरून हॉटेलमध्ये घुसून एका अतिरेक्याला कंठस्नान घातले. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकारानंतर अनेकजण गोंधळून गेले. तथापि, ही अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या सरावासाठी मॉक ड्रील असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युतर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) शिर्डीत सोमवारी सायंकाळी अचानक मॉक ड्रील केले. यात मुंबई येथील राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे सव्वाशे जवान सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर श्वानपथक, बॉम्ब शोधक व नष्ट करणारे पथक, डॉक्टर्स, रुग्णवाहिका आदींचा सहभाग होता. यामुळे साईबाबा संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर येवून त्या दुरूस्त करता येवू शकतील, असाही उद्देश आहे़. नागरिकांना व भाविकांना या सराव मोहिमेचा त्रास होऊ नये म्हणून पथक विशेष काळजी घेत आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post