अहमदनगर : सोलापूर रोडवर अपघातात तीन ठार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : सोलापूर रोडवरील आंबिलवाडी जवळ एसटी बस आणि झायलोचा अपघात होऊन तीन जण ठार झाले आहेत. शनिवारी (दि.२८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातातील मृत हे नगर मधील आहेत. झायलो गाडीचा चालक अरुण बाबुराव फुळसौंदर (वय ५५) , अर्जुन योगेश भगत (वय १४), ताराबाई शंकर भगत (वय ६०) या तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून एक लहान बालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच एसटी बस मधील काही प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post