'प्रभाग ६ अ' पोटनिवडणूक : प्रारुप मतदार यादी प्रसिध्द


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महापालिकेच्या ‘प्रभाग 6 अ’च्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारी (दि.27) 13 हजार 621 मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. दरम्यान, 3 जानेवारीपर्यंत मतदार यादीवर हरकती नोंदविता येणार आहेत.
आयोागच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या यादीनुसार महापालिका प्रशासनाने ‘प्रभाग 6 अ’ची प्रारुप मतदार यादी तयार केली आहे. यात 13 हजार 621 मतदारांचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग सहामध्ये 13 हजार 316 मतदार होते. त्या तुलनेत सध्याच्या यादीत 305 मतदार वाढले आहेत.
प्रारुप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी 3 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिकेत या हरकती नोंदविता येणार आहेत. 8 व 9 जानेवारीला मतदान केंद्रांसह मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 11 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post