'संसदेत उत्तरं न देणारे अमित शाह, आता राहुल गांधींना चर्चेचं आव्हान देत आहेत'


एएमसी मिरर वेब टीम 
थिरुवअनंतपुरम : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अद्यापही देशातील विविध भागांमध्ये निषेध आंदोलने, मोर्चे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनतेला भडकावत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचं आव्हानंही दिलं आहे. यावर माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शहा यांच्यावर पलटवार केला आहे. संसदेत विरोधकांच्या एकाही प्रश्नाला उत्तरं न देणारे अमित शाह आता राहुल गांधींना चर्चेचं आव्हान देत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

केरळची राजधानी थिरुवअनंतपुरम येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. चिदंबरम म्हणाले, “अमित शाह यांनी मागं जाऊन पुन्हा एकदा सुधारित नागरिकत्व कायद्यावर राज्यसभा आणि लोकसभेत झालेल्या चर्चा ऐकाव्यात. त्यांनी त्यावेळी विरोधकांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. आता तेच शाह राहुल गांधी यांना चर्चेच आव्हान देत आहेत. या कायद्याबाबत सरकारने सर्वकाही चुकीच केलं आहे.”

Post a Comment

Previous Post Next Post