एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार असल्याचं वृत्त येताच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. अमृता फडणवीसांनी शिवसेनेला ढोंगी म्हणत, दलालीचा आरोप केलाय. यानंतर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनीही त्याला प्रत्युत्तर दिल आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नसल्याचं प्रियंका चतुर्वेदींनी स्पष्ट केल आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Post a Comment