तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करु शकत नाही : अमृता फडणवीस


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून तीव्र पडसाद उमटत असून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. दुसरीकडे अमृता फडणवीस यादेखील माघार घेण्यास तयार नसून ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करताना पिंपरीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं होतं. ज्या पोस्टरवर हे जोडे मारण्यात आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता. तसंच यावेळी राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा अशा घोषणाही देण्यात आल्या. अमृता फडणवीस यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत लिहिलं आहे की, “तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करु शकत नाही. हा हल्ला आहे, नेतृत्त्व नाही,” असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी एक शेरही पोस्ट केला आहे :

दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका,
हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !

Post a Comment

Previous Post Next Post