तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही : मनेका गांधीएएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : भाजप खासदार मनेका गांधी यांनी हैदराबाद चकमकीवर प्रतिक्रिया दिली असून हा अत्यंत भयानक प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत.
मनेका गांधी यांनी चकमकीवर बोलताना सांगितलं आहे की, “जे झालं आहे ते देशासाठी अत्यंत भयानक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने त्यांना अशीही फाशीची शिक्षा सुनावली असती. तर तुम्ही न्यायलयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय?”.
BJP MP Maneka Gandhi on Telangana encounter: Jo bhi hua hai bohot bhayanak hua hai is desh ke liye, you cannot kill people because you want to. You cannot take law in your hands, they(accused) would have been hanged by Court anyhow pic.twitter.com/4in4sBMJDp
— ANI (@ANI) December 6, 2019
मनेका गांधी यांच्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली असून चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. “या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे,” असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
Post a Comment

Previous Post Next Post