‘हो नक्कीच काहीतरी कमतरता राहिली’, अमित शाहंची कबुली


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (NRC) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) या दोघांचा परस्परांशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केलं. त्यावेळी अमित शाह यांना सुधारित नागरिकत्व कायदा नेमका काय आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडले का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर, ‘हो नक्कीच काहीतरी कमतरता राहिली असेल, हे सत्य स्वीकारण्यात मला काहीही अडचण नाही, पण संसदेतील माझे भाषण पाहा, त्यामध्ये मी सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाच्याही नागरीकत्वाला धोका नाही हे स्पष्ट केले आहे.”

सुधारित नागरिकत्व कायदा झाल्यापासून देशाच्या वेगवेगळया भागात हिंसक आंदोलने सुरु आहेत. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करुन कारवाई करावी लागली. त्यामध्ये काही आंदोलकांचा मृत्यू झाला. आज मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने जनगणनेच्या नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरला मंजुरी दिली. त्यावरुन गोंधळ आणि अफवा पसरु नयेत, यासाठी अमित शाह यांनी मुलाखत देऊन एनआरसी आणि एनपीआरला मधला फरक स्पष्ट केला.

एनआरसी आणि एनपीआरमधला फरक समजावून सांगताना अमित शाह म्हणाले की, “एनपीआरमधून काही नावे सुटू शकतात. पण म्हणून त्यांचे नागरिकत्व रद्द करणार नाही. एनआरसी एक वेगळी प्रक्रिया आहे. एनपीआरमुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही हे मी स्पष्ट करतो.”


Post a Comment

Previous Post Next Post