#CAA : आंदोलनामुळे रेल्वेचे 90 कोटींचे नुकसान


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : नागरिकता सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी हिंसंक आंदोलनेही झाली आहेत. आंदोलकांनी ठिकठिकाणी रेल्वे रोको करून रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. ईशान्येकडील राज्यात आतापर्यंत झालेल्या हिंसाचरात 90 कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात आरपीएफचे काही जवानही जखमी झाले आहेत, अशी माहिती रेल्वे संरक्षण दलाचे प्रमूख अरूण कुमार यांनी दिली.
पूर्व ऱेल्वेच्या मालमत्तेचे सुमारे 72.19 कोटींचे नुकसान झाले आहे. दक्षिण पूर्व विभागात सुमारे 12.75 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. उत्तर ऱेल्वे विभागात रेल्वेच्या मालमत्तेचे सुमारे 2.98 कोटींचे नुकसान झाले आहे. भ्रष्टाचार,मालमत्तेचे नुकसान आणि इतर प्रकरणी तब्बल 85 गुन्हे दाखल झाले आहेत आणि या मध्ये 57 गुन्हे रेल्वे सुरक्षा दलातंर्गत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post