दोन दिवसांत खातेवाटप करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणाएएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यात सरकार स्थापनेच्या सर्व प्रक्रिया आणि आवश्यक नियुक्त्या पार पडल्यानंतर आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रविवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पार पडली, या सर्वातून आम्ही आता मोकळे झालो आहोत, त्यामुळे यापुढील काम वेगाने करु. खातेवाटपही एक दोन दिवसांत करु, तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही. म्हणून अद्याप खातेवाटप झालेले नाही मग आता काय होणार अशी काळजी करण्याचे कारण नाही.”


Post a Comment

Previous Post Next Post