अहमदनगर : धनादेशाच्या अनादर प्रकरणी तुरुंगवास व दंडाची शिक्षा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कर्जत व अहमदनगर येथील वाहतुकदार विशाल विलासराव महाजन यांनी सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल सहकारी पतसंस्था मर्या., अहमदनगर यांना दिलेला चेक वटला नाही आणि पतसंस्थेला धनादेशाचे पैसे मिळाले नाही म्हणुन पतसंस्थेने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये आरोपी विशाल विलासराव महाजन यास 1 वर्षे साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
त्यांनी सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल सहकारी पतसंस्था मर्या., अहमदनगर यांना निकालापासून एक महिन्याच्या आत रक्कम रुपये पाच लाख नुकसान भरपाई म्हणून द्यावी. सदरची रक्कम न दिल्यास आणखी सहा महिने साध्या तुरुंगवासाची शिक्षा डी. आर. दंडे यांनी नुकतीच सुनावली.
खटल्याची पार्श्वभूमी विशाल विलासराव महाजन यांनी वरील पतसंस्थेकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडी पोटी त्यांनी पतसंस्थेला रक्कम रुपये तीन लाखाचा धनादेश दिला होता. धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेने आरोपीस नोटीस पाठवून देखील त्यांनी रक्कम दिली नाही व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला होता. त्यामुळे पतसंस्थेने अॅड. मनिष. पी. गांधी यांच्या मार्फत नगर येथील कोर्टात चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली होती.
त्याची रितसर गुणदोषावर सुनावणी होऊन तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या दाखल्यांचा संदर्भ घेऊन कोर्टाने आरोपी विशाल विलासराव महाजन यांना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. या खटल्याच्या कामी पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रशांत भंडारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पतसंस्थेच्यावतीने अॅड. मनिष. पी. गांधी यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post