नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : ११७ विरुद्ध ९२ च्या फरकाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकावर दिवसभर चर्चा सुरु होती. अखेर मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत ११७ मतं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने पडली. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या विरोधात ९२ मतं पडली. 
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यापूर्वी वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी हे विधेयक देशहिताचं नाही अशी भूमिका घेतली होती. बुधवारी या विधेयकावर राज्यसभेत चर्चा पार पडली. त्यानंतर मतदान घेण्यात आलं. ११७ विरुद्ध ९२ च्या फरकाने हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. यावेळी सभागृहात ४ सदस्य प्रकृती चांगली नसल्याने हजर नव्हते. तर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घालत सभात्याग केला.
शिवसेनेने या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने भूमिका बदलली. शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधेयकातली तथ्य पडताळून पहावी लागतील आणि त्यानंतर पाठिंबा द्यायचा की नाही हा विचार करावा लागेल असं म्हटलं होतं. ज्यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सडकून टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post