विधानसभेआधी भाजपला धक्का, दिल्लीकरांची मोदींपेक्षा केजरीवांलांना पसंती


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू होणार आहे. विधानसभेसाठी सर्व पक्ष कंबर कसून तयार होत असताना नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे.
लोकनीती सीएसडीएस यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना 42% टक्के मत दिले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 32% मत दिले आहे. तसेच केजरीवाल यांच्या सरकारच्या कामाने तब्बल 53 टक्के जनता ही खूष आहे.  दिल्लीच्या 23 विधानसभा मतदारसंघातील 115 ठिकाणी सर्वे करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान हा सर्वे करण्यात आला. यातील बहुतांश लोकांनी केजरीवाल सरकारने शिक्षण, वाहतूक, आरोग्य या क्षेत्रात चांगले काम केल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post