'..तर पाडापाडी करणाऱ्या भाजपा नेत्यांची नावं जाहीर करेन'

 
एएमसी मिरर वेब टीम 
जळगाव : माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. खडसेंच्या या आरोपाला उत्तर देताना, महाजन यांनी भाजपामधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज दिलं होतं. महाजन यांचं हे चॅलेंज खडसेंनी स्वीकारत प्रदेक्षाध्यशांनी परवानगी दिल्यास पाडापाडीचं राजकारण करणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांची नावे जाहीर करेन, असा थेट इशारा खडसेंनी गिरीश महाजन यांना दिला आहे. 
नाराज खडसेंची मनधरणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जळगावात धाव घेतली आहे. शनिवारी जळगावात पाटील यांनी खडसेंची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. जळगावात भाजपाची विभागीय समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीकडे खडसेंनी पाठ फिरवल्याचे वृत्त प्रथम आले होते. मात्र साडेतीन वाजताच्या सुमारास खडसे बैठकीला दाखल झाले. बैठकीला पोहचण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच नाराज नसल्याचेही सांगितले.
पाडापाडीचं राजकारण करणाऱ्याचे पुरावे असतील तर ते खडसे यांनी जाहीर करावेत, असे गिरीशभाऊ म्हणाले आहेत. त्यानुसार मी माझ्याकडचे पुरावे नावानिशी जाहीर करायला तयार असल्याचे खडसे यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post