हेमंत सोरेन बनले झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री


एएमसी मिरर वेब टीम 
रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.

हेमंत सोरेन (वय ४४) हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. सोरेन यांच्यासह काँग्रेसचे विधिमंडळ नेते आलमगिर आलम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरान आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्त यांनी देखील यावेळी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली.

एकूण ८१ जागा असलेल्या झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात आघाडी असलेल्या जेएमएम-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाने एकूण ४७ जागा जिंकल्या. सरकार स्थापनेसाठी ४२ जागांची आवश्यकता असल्याने या आघाडीने बहुमताचा आकडा सहजरित्या पार केला आहे. निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चा (प्रजातंत्रिक) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) या पक्षांनीही तीन पक्षांच्या आघाडीला पाठींबा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post