'कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय'


एएमसी मिरर वेब टीम 
हैदराबाद : हैदराबाद प्रकरणात आरोपी असणारे चार जण पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला, पण बहुतांश भारतीयांनी पोलिसांचे कौतुक केले. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने देखील पोलिसांच्या कृत्याचे समर्थन केले आहे.
“आज सकाळी सकाळी मनाला सुखावणारी बातमी मिळाली. हैदराबादमध्ये झालेली चकमक म्हणजे कायद्याच्या रक्षकांनी समाजातील राक्षसांवर मिळवलेला विजय आहे. पोलीस विभागाला कोटी-कोटी प्रणाम. निर्णय घेण्याची पद्धत कोणतीही असो, पण जे झाले ते प्रशंसनीय आहे”, असे ट्विट करत त्याने पोलिसांचे कौतुक केले.

पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपी मारले गेले आहेत, ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला. पण या प्रकरणातील आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.
संपूर्ण देशात या प्रकरणाबाबत संतापाची लाट होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते, तर पुन्हा अशी घटना घडली असती. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post