एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच : अजित पवार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई :  एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचं स्वागतच करु असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली. पंकजाताई भाजपातच आहेत, माझा काही भरवसा नाही, असेही ते म्हणाले होते. याबाबत जेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे विधान केले. एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागत करु. पंकजा मुंडे यांची नाराजी हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला बंडाचे नायक म्हणत आहेत, त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नो कॉमेण्टस अशी प्रतिक्रिया दिली. भाजपाने शिवसेनेसाठी दारं खुली असल्याचं म्हटलंय याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, भाजपाने शिवसेनेला ऑफर देऊ दे की, काहीही हरकत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. सध्या शिवसेना आमच्यासोबत आहे एवढंच मी सांगेन, असे ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post