शिवसेना आक्रमक, थिएटरमध्ये घुसून कन्नड सिनेमाचा शो पाडला बंद


एएमसी मिरर वेब टीम 
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कर्नाटकात पुतळा जाळल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून युवासैनिकांनी कोल्हापूरमध्ये थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडलाय. याशिवाय युवासैनिकांनी चित्रपटगृहावरील कन्नड पोस्टरही उतरवले आहेत. सीमावादातून दोन्ही राज्यांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. खबरदारी म्हणून दोन्ही राज्यांतील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिक आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासैनिकांनी कोल्हापूरच्या अप्सरा थिएटरमध्ये सुरू असलेला ‘अवणे श्रीमनारायन’ हा चित्रपट थिएटरमध्ये घुसून बंद पाडलाय. याशिवाय चित्रपटगृहावरील कन्नड पोस्टरही फाडले.

Post a Comment

Previous Post Next Post