संपत्तीच्या वादातून महिलेची हत्या; 3 जणांना अटक


एएमसी मिरर वेब टीम 
कोलकाता : पोलिसांनी 65 वर्षांच्या महिलेच्या हत्येचं गूढ उकलले असून त्यांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या महिलेची सून आणि नातीचा समावेश आहे. या दोघींशिवाय सूनेचा मित्र सौरव पुरी यालाही अटक करण्यात आली आहे.
डिंपल जुंद (सून) असे अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव असून तिच्याशिवाय तिच्या मुलीलाही अटक करण्यात आली आहे. या दोघींना कोलकात्यामध्ये अटक करण्यात आली आहे. तर डिंपलचा मित्र सौरव याला पंजाबमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर हत्येमागचे कारण समोर आले. ज्या महिलेचा खून झाला तिचे नाव उर्मिला देवी (वय-68) असं आहे. उर्मिला यांच्या मालकीचे रिची रिच रोडवर घर आहे. या घरावरून आणि संपत्तीवरून त्यांच्याशी डिंपलचे खटके उडाले होते.
उर्मिला यांचा मृतदेह गरचा रस्त्यावरील एका घरात मृतदेह आढळला होता. त्यांच्या शरिरावर सुऱ्याने भोसकल्याच्या अनेक जखमा होत्या तसेच त्यांच्या डोक्यावरही वार करण्यात आले होते. उर्मिला त्यांच्या लहान मुलासोबत राहात होत्या. मात्र हा मुलगा कूचबिहार इथे लग्नासाठी गेला होता. उर्मिलादेवी ज्या घरात राहतात ते भाड्याचे घर असून घरमालकाने सकाळी 12.20 वाजता घरातून ओरडण्याचे आवाज ऐकले होते. कोणाचे तरी डोके भिंतीवर आपटत असल्याचेही आवाज त्याला ऐकायला आले होते.
डिंपल ही उर्मिला देवींची सून असून तिचे लग्न त्यांच्या मोठ्या मुलाशी म्हणजे मनदीपशी झाले होते. मनदीपचा 5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. डिंपलला मुलगी असून ती शाळेत शिकते. तिने आणि डिंपलच्या मित्राने म्हणजेच सौरवने उर्मिला यांचा खून केला होता. खून झाला तेव्हा डिंपल तिथे नव्हती मात्र ती हत्येचा कट रचण्यात सहभागी होती याचे पोलिसांना पुरावे सापडलेले आहेत.
डिंपलचा नवरा मनदीप आणि उर्मिला यांचा लहान मुलगा बलराज हे दोघे मिळून व्यवसाय करत होते. मनदीपच्या मृत्यूनंतर बलराज मनदीपच्या कुटुंबियांना मिळकतीतील ठराविक रक्कम देत होता. डिंपलला ही रक्कम वाढवून हवी होती तसेच रिची रीच रस्त्यावरील घरही तिला आपल्या नावावर करून हवे होते. उर्मिला देवा याला तयार नसल्याने डिंपलने त्यांचा खून करायचं ठरवलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post