फडणवीस सरकारला महाराष्ट्राने शिक्षा दिली : जयंत पाटील


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : भाजपाने पक्ष फोडण्याचं जे काम केलं, त्या मार्गाने आम्हाला जायचं नाही. राज्य कोणत्याही परिस्थिती मिळवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न जे देवेंद्र फडणवीस सरकारने केले. त्याची शिक्षा महाराष्ट्राने त्यांना दिलेली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
खातेवाटप करण्याचा सर्व अधिकार मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा करत आहेत, तेच योग्यवेळी निर्णय घेतील, यात कोणतीही अडचण नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार तुम्हाला झालेला दिसेल असं देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलाताना सांगितलं आहे.
आमच्या पक्षात जर कुणाला यायचं असेल तर रीतसर त्यांच्याबाबत चर्चा केली जाईल. सरकार वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आम्ही पक्षांतर कुठेही करू देणार नाही. पण जर स्थानिक पातळीवर कुणाला आमच्या पक्षात यायचं असेल, तर त्याचं स्वागत करताना आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेवून पावलं टाकू. जे आम्हाला सोडून गेले त्यातील अनेकजण अस्वस्थ आहेत, संपर्कात आहेत. यशावकाश योग्य तो निर्णय आम्ही त्यांच्यासाठी घेणार आहोत, गडबडीत कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post