पैसे-दागिने नव्हे, तो चोरायचा महिलांची अंर्तवस्त्रे?


एएमसी मिरर वेब टीम 
सिडनी : सामान्यपणे दागिने, पैसे, गाड्या, महागड्या वस्तूंची चोरी होते असा आपला आजवरचा समज आहे. परंतु एका चोराने हा समज पार खोडून काढला आहे. हा चोर हॉटेलमधील स्त्रियांची वाळत घातलेली अंर्तवस्त्रे चोरायचा. अनेक दिवसांपासून मागावर असलेल्या पोलिसांना हा चोर अखेर सापडला.
ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील एका हॉटेलमधून स्त्रियांची महागडी अंर्तवस्त्रे चोरीला जात असल्याच्या वारंवार तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. संपूर्ण हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असुन देखील हा चोर पकडला जात नव्हता. एक दिवस पोलिसांनी सापळा रचून हॉटेलच्या मागच्या बाजूने खोलीत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला पकडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर हाच व्यक्ती महिलांच्या अंर्तवस्त्रांची चोरी करत असल्याची माहिती समोर आली.
या ३७ वर्षीय आरोपी व्यक्तिचे नाव डॅनिअल अल हॅमिल्टन असे आहे. पोलिसांना त्याच्या घरात एक दोन नव्हे तर तब्बल १ हजार अंर्तवस्त्रं सापडली. या आरोपीची वैद्यकीय चाचणी केली असता तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. मेल ऑनलाईन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असुन प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

Post a Comment

Previous Post Next Post