मराठी नाट्य स्पर्धा : अहमदनगर केंद्रातून 'एक होता बांबुकाका' प्रथम


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत केंद्रातून रंगकर्मी प्रतिष्ठान, अहमदनगर या संस्थेच्या ‘एक होता बांबुकाका’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघ, अहमदनगर या संस्थेच्या ‘मोमोज’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
‘एक होता बांबुकाका’ व ‘मोमोज’ या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. समर्थ युवा प्रतिष्ठान, अहमदनगर या संस्थेच्या ‘रात संपता संपेना’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

अहमदनगर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे :

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक शैलेश देशमुख (नाटक-एक होता बांबूकाका), द्वितीय पारितोषिक उर्मिला लोटके (नाटक-मोमोज),
प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक मुन्ना सय्यद (नाटक-एक होता बांबुकाका), द्वितीय पारितोषिक रवि रहाणे (नाटक-अमन या शांती),
नेपथ्य : प्रथम पारितोषिक अनंत रिसे (नाटक-दास्तॉं), द्वितीय पारितोषिक संभाजी पिसे (नाटक-शापित माणसांचे गुपित),
रंगभूषा : प्रथम पारितोषिक नाना मोरे (नाटक-अमन या शांती), द्वितीय पारितोषिक ज्योती कराळे (नाटक-शापित माणसांचे गुपित).
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक राहुल सुराणा (नाटक- एक होता बांबुकाक) व रेणुका भिसे (नाटकशापित माणसांचे गुपित),
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राजक्ता प्रभाकर (नाटक-अमन या शांती), पूर्वा खताळ (नाटक-लहान माझी बाहुली), आम्रपाली गायकवाड (नाटक-मलिका), दिव्या पाटील (नाटकरात संपता संपेना), रविना सुगंधी (नाटक-दास्तॉं), श्रेणिक शिंगवी (नाटक-दास्तॉं), सुरेश चौधरी (नाटकरात संपता संपेना), नवनाथ वाबळे (नाटक-शेवंता जिती हाय), श्रीराम गोरे (नाटक-अमन या शांती), मादव लोटके (नाटक-मोमोज).

16 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत माऊली सांस्कृतिक सभागृह, अहमदनगर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 17 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामदास तांबे, श्रीकांत सागर व श्रीमती कुंदा पी. एन. यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post