एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित पानिपत हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
पानिपतची लढाई ही मऱ्हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मऱ्हाठ्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा, अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
यापूर्वी राज ठाकरे यांनी ‘पानिपत’च्या ट्रेलनंतरही त्याची स्तुती केली होती. “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे.” असं राज ठाकरे म्हणाले होते.
Post a Comment