'माझे ऐकू नका पण, गांधीजींचे तरी ऐका'


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी ‘सीएए’विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली. “कुणाचंही नागरिकत्व काढलं जाणार नाही,” असं आश्वासनं देत “माझं ऐकू नका पण महात्मा गांधीजींचं तरी ऐका,” असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.
एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध दर्शविला जात आहे. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांवरून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच भूमिका मांडली. रामलीला मैदानावरून अप्रत्यक्षरीत्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकताना मोदी म्हणाले, “विरोधकांकडून एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहे. सरकार छावण्या सुरू करणार आहे, असं सांगितलं जात आहे. पण, भारतीय मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. अर्बन नक्षलवादीही खोटी माहिती पसरवत आहेत. निवडणुकीत जनतेनं नाकारल्यानंतर विरोधकांकडून जुनं अस्त्र बाहेर काढण्यात आलं. काही जणांकडून गांधी आडनावाचा फायदा घेतला जात आहे. अनेकांना वाटत मोदींना सुधारित नागरिकत्व कायदा केला. पण, हे तर महात्मा गांधीनींच सांगितलं होत. माझं विरोधकांना आवाहन आहे की, माझं ऐकायचं नसेल तर ऐकू नका. पण, महात्मा गांधी जे म्हणाले, ते तरी ऐका. भारत-पाकिस्तान फाळणी वेळी गांधीजी म्हणाले होते की, पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू आणि शीख बांधवांना जेव्हा वाटेल, तेव्हा त्यांचं भारतात स्वागत केली जाईल. त्यात मोदी सरकारनं काहीच नाही केलं नाही, “असं मोदी म्हणाले.
काही राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना राज्यांना मोदींनी सुनावलं. मोदी म्हणाले, “काही राज्यांनी आता एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. मात्र, त्यांनी बोलण्याआधी समजून घ्यायला हवं. त्यांनी हा कायदा राज्यातल्या अधिकारातील आहे की नाही याविषयीराज्यांच्या कायदेसल्लागारांशी चर्चा करावी. म्हणजे तोंडावर पडणार नाहीत,” असा उपरोधिक टोला मोदी यांनी लगावला.


Post a Comment

Previous Post Next Post