आरोपींना जनतेसमोर ठेचून मारा; जया बच्चन संतापल्या


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद येथील घटनेवर संसदेत संताप व्यक्त केला. हैदराबाद येथे बलात्कार करून करून महिला पशुवैद्यकास पेटवून ठार करण्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले.
“निर्भया असो, कठुआ असो किंवा मग हैदराबादमध्ये घटलेली घटना असो, आता लोकांना सरकारकडून योग्य आणि निश्चित उत्तर हवंय. हैदराबादमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच्या एक दिवस आधी तिथेच एक दुर्घटना घडली. तिथल्या सुरक्षाकर्मींना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी संसदेत दिली.


Post a Comment

Previous Post Next Post