महापोर्टल बंद करा; खा. सुप्रिया सुळेंची मागणीएएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भोंगळ कारभारामुळे प्रसिद्ध असलेले महापोर्टल बंद करण्याची मागणी केली.
शासकीय नोकर भरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली. या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ते बंद व्हावे अशी मागणी केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले.
राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये पदभरती करण्यासाठी राज्य सरकारच्या आयटी विभागाने महापरीक्षा पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलव्दारे परीक्षा घेण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे.
दरम्यान, दिव्यांगाच्या २०१६ सालच्या कायद्यामुळे २१ प्रकारच्या दिव्यांग प्रकारांना सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांबाबतच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. यामुळेच इतर काही राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे, याच धर्तीवर महाराष्ट्रातही सचिव ते जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावा, अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. या पार्श्वभूमीवर या संदर्भातील घोषणा झाली, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. आपणास विनंती आहे की, याबाबतचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post