नवनिर्वाचित आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 9 डिसेंबर रोजी सत्कारएएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : 9 डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नवनिर्वाचित विधानसभा सदस्याचा सत्कार समारंभ कार्यक्रम राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष तथा पक्षाचे जिल्हा प्रभारी आ. दिलीपराव वळसे पाटील यांचे हस्ते व पुणे शहराचे माजी महापौर तथा पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांचे प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, नगर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
या सत्कार संभारभ कार्यक्रमासाठी जिह्यातील माजी खासदार, आजी – माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदचे पदाधिकारी व सदस्य, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत व मार्केट कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सरचिटणीस सोमनाथ धूत यांनी दिली.
9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे.
 


 

Post a Comment

Previous Post Next Post