आरेतील मेट्रो कारशेडसाठी राष्ट्रवादीनं सुचविली पर्यायी जागा


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘आरे’मधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिली. राज्य सरकारचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकासकामे केली जाणार नाहीत. दिलेला शब्द पाळणे, हे आपले तत्त्व आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीनं काँग्रेसनं मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीच ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, “आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. त्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे की, हे कारशेड उभारायचे कुठे? त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांना पर्यायी जागा सुचवली आहे. गोरेगाव येथे १०२ हेक्टर जागेवर आरपीएफचे (राखीव पोलीस दल) मैदान आहे. ज्याचा बहुतांश वापर हा लग्नसोहळ्यांसाठी होतो. त्यामुळे ६० हेक्टर जागेवर तिथे मेट्रो कारशेड उभारता येईल असा पर्याय सुचवला आहे, अशी माहितील मलिक यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post