काश्मीर मुद्यावर अजिबात तडजोड करणार नाही : पाकिस्तान लष्करप्रमुख


एएमसी मिरर वेब टीम
मुझफ्फराबाद :
काश्मीरच्या मुद्दावर आम्ही अजिबात तडजोड करणार नाही असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे. बाजवा यांनी नियंत्रण रेषेची पाहणी केली तसेच मुझफ्फराबाद येथील लष्करी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी काश्मीर मुद्दावर हे मत व्यक्त केले.

“काश्मीर मुद्दावर अजिबात तडजोड करणार नाही. आम्हाला शांतता हवी असली तरी, कोणी त्याला दुर्बलता समजण्याची चूक करु नये. कोणी आक्रमकता दाखवल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत” असे बाजवा म्हणाले.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच आगपाखड केली. भारताला युद्धाचे इशारे दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान काश्मीरच्या मुद्दावर पूर्णपणे अपयशी ठरला. चीन, मलेशिया आणि टर्की हे तीन देश वगळता त्यांना अन्य देशांची साथ मिळाली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post