माझे नाव राहुल सावरकर नाही!


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : ‘माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. मी माफी मागणार नाही’ असे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. दिल्लीत काँग्रेस पक्षाने ‘भारत बचाव’ आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनासाठी देशभरातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी देशाची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कायद्या सुव्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी यांनी हिंदुस्थान हा रेप कॅपिटल झाला आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेते आक्रमक होऊन त्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर राहुल गांधी सभेत म्हणाले की, “माझे नाव राहुल सावरकर नाही, मी माफी नाही. सत्य बोलण्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही.” जीव देईन पण माफी मागणार नाही, तसेच मीच काय काँग्रेसचा कुठलाच व्यक्ती माफी मागणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. कारण देशाची अर्थव्यवस्था ही देशाची आत्मा आहे, ही अर्थव्यवस्थाच मोदींनी मोडून टाकली.” म्हणून पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post