सर्व हिंदू आहेत असं म्हणणे योग्य नाही : आठवले


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी हिंदुत्वावरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीयमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वजण हिंदू आहेत असं म्हणणे योग्य नाही. एक काळ होता जेव्हा आमच्या देशात सर्वजण बुद्धिस्ट होते. जेव्हा हिंदुइझम आले तेव्हा आम्ही हिंदू राष्ट्र झालो. जर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, सर्वजण आमचे आहेत तर मग ते चांगले आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता ज्यांच्या मनात राष्ट्रवादाची भावना आहे आणि भारताच्या संस्कृतीप्रती आदर आहे ते हिंदू आहेत आणि देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. संपूर्ण समाज हा आपलाच आहे आणि एकात्मिक समाजाची निर्मिती करणं हे संघाचं उद्दिष्ट्य असल्याचंही भागवत म्हणाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post