एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : भारतीय संघाने वर्षाची शेवट दमदार मालिका विजयाने केली. वेस्ट इंडिजविरूद्धच्या शेवटच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने पाहुण्या संघाला ४ गडी राखून धूळ चारली. या विजयासह भारताने २१ व्या शतकातील दुसऱ्या दशकाची (२०१०-२०१९) शेवटही गोड केला. गेल्या काही वर्षात भारतीय संघाची भरभराट झाली. २०११ च्या विश्वचषक विजयापासून ते २०१९ च्या शेवटच्या मालिका विजयापर्यंत टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. त्यातही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल स्थानी आहे. पण प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘विस्डन’च्या ‘दशकातील सर्वोत्तम ११ कसोटीपटूं’च्या यादीत केवळ २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
११ खेळाडूंच्या या यादीत सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी ३ खेळाडू हे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे आहेत. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांचे २-२ खेळाडू आहेत. तर श्रीलंकेच्या केवळ एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. लॉरेन्स बूथ, जो हार्मन, फिल वॉकर आणि यास राना या चार सदस्यांच्या समितीने या ११ क्रिकेटपटूंची निवड केली आहे.
दशकातील सर्वोत्तम ११ क्रिकेटपटू
१. अॅलिस्टर कूक (इंग्लंड)
२. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
३. कुमार संगाकारा (श्रीलंका)
४. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
५. विराट कोहली (भारत)
६. बेन स्टोक्स (इंग्लंड)
७. एबी डी व्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)
८. रविचंद्रन अश्विन (भारत)
९. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
१०. कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
११. जेम्स अँडरसन (इंग्लंड)
विराटची या दशकातील आकडेवारी
धावा – १ लाख ११ हजार २५
शतके – ४२
अर्धशतके – ५२
सामनावीर पुरस्कार – ३५
मालिकावीर पुरस्कार – ७
चौकार – १०३८
झेल – ११७
सामने – २२७
Post a Comment