सावरकरांविषयी वादग्रस्त विधान : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार


एएमसी मिरर वेब टीम 
नागपूर : नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सावरकरवादाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फडणवीस म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या विधानावर निषेधाचा प्रस्तावही मांडला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post