पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील जनतेचे मानले आभार


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले असून, राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पाच वर्षे राज्याच्या सत्तेत राहणाऱ्या भाजपाला जनतेने विरोधीपक्षात बसण्याचा कौल दिला आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि राज्याचे संभाव्य भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. शिवाय, राज्याची सेवा करण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
मी झारखंडमधील जनतेचे आभार व्यक्त करतो, त्यांनी अनेक वर्षे भाजपाला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. तसेच, मी पक्षाचे मेहनती कार्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा करतो. आम्ही येणाऱ्या काळात राज्याची सेवा करत राहू, तसेच जनेतेशी निगडीत मुद्दे वेळोवेळी उचलत राहू असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post