'आरएसएस'ची चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही : राहुल गांधी


एएमसी मिरर वेब टीम 
गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आरएसएसची चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि आरएसएसला आसामची संस्कृती, भाषा यावर अतिक्रमण करु द्यायचं नाही हे लक्षात ठेवा. आसामचा कारभार नागपूरवरुन चालणार नाही. आरएसएसचे चड्डीवाले आसामचा राज्य कारभार चालवणार नाहीत. आसामचा राज्य कारभार लोकशाही पद्धतीनेच चालला पाहिजे हे विसरु नका, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

गुवाहाटी येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. सध्या देशात जे काही सुरु आहे त्यामागे भाजपाचा नियोजनबद्ध कट आहे. भाजपा जिथे जाईल तिथे द्वेष पसरवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं. आसामच्या जनतेला असा द्वेष पसरवणारे लोक मान्य नाहीत. त्यामुळे आसामची सत्ता जर कोणी चालवणार असेल तर ती आसामच जनताच असेल. इथला कारभार नागपूरवरुन चालवला जाणार नाही. आरएसएसची चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post