एएमसी मिरर वेब टीम
सांगली : तीस हजाराची मागणी पूर्ण करण्यास नकार देणाऱ्या मातेचा मुलानेच दारूच्या नशेत धारदार शस्त्राने खून केल्याचा प्रकार जतमध्ये घडला. यातील संशयित तरुणाला कोल्हापुरातून पोलिसांनी अटक केली आहे.
जतमध्ये दुधाळ वस्तीवर राहणारा श्रीकांत राजाराम जाधव याने आई मंजुळा जाधव (वय ४५) हिचा गुरुवारी रात्री धारदार हत्याराने वार करून खून करण्याचा प्रकार घडला. श्रीकांत हा जतमध्ये जीपवर चालक म्हणून काम करीत असतो. रात्री घरी आल्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत आईकडे ३० हजार रुपये मागितले. मात्र आईने हे पसे देण्यास नकार दिला. यातून दोघामध्ये वादावादी झाली. या वादावादीतच त्याने महिलेवर हल्ला केला.
याबाबत मृत महिलेची विवाहित मुलगी स्वाती गायकवाड यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकारानंतर संशयिताने कोल्हापूरला प्रयाण केले होते. काल त्याला कोल्हापुरातून ताब्यात घेतले.
Post a Comment