नेवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदार संघामध्ये भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांना रविवारी सायंकाळी अचानकपणे फोन आल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्यामध्ये सलग सात वेळा निवडून येण्याचा मान बाळासाहेब थोरात यांना मिळाला होता. त्यांना अगोदरच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये आता नगर जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश झाला आहे.
भाजपच्या सत्ताकाळात केवळ एक मंत्रीपद देवून बोळवण करण्यात आली होती. राधाकृष्ण विखे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचा समावेश करुन घेत आणखी एक मंत्रीपद जिल्ह्याला देण्यात आले. अखेरच्या टप्प्यात विधानसभा उपसभापती पद नगर जिल्ह्याला मिळाले. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्तेत जिल्ह्याला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळाले आहे. आणखी एखादे महामंडळही दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारमध्ये नगरचा दबदबा वाढणार आहे.
Post a Comment