ऊसतोड मजूर पुरवणाऱ्या मुकादमाची आत्महत्या


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : साखर कारखान्याला ऊसतोड मजूर पुरवणाऱ्या एका मुकादमाने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील सोनोशीमध्ये घडली. भागवत गणपत चाचर ( वय 50) असे आत्महत्या करणाऱ्या मुकादमाचे नाव आहे. भागवत चाचर काही साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवण्याचे काम करत होते.
साखर कारखान्याला मजूर पुरवण्यासाठी चाचर यांनी काही साखर कारखान्यांशी करार केला होता. मजुरांना पैसे देण्यासाठी त्यांनी काही बँकेतून तसेच खाजगी सावकाराकडून पैसे घेतले होते. ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना पैसे देत त्यांनी मजुरांना साखर कारखान्यावर उस तोडण्यासाठी जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी ज्यांना पैसे दिले ते मजूर उसतोडण्यासाठी दुसरीकडे गेले होते. त्यामुळे आपण उसनवार करून घेतलेले पैसे कसे फेडायचे याची चिंता त्यांना होती. या चिंतेतूनच त्यांनी रविवारी सकाळी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी 10 वाजता ही घटना गावात समजली. आत्महत्येपूर्वी चाचर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या संदर्भात अकस्मात मृत्यूचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. बाबर करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post