तक्रारींसाठी स्वच्छता ॲप डाउनलोड करा; नगरसेवक संपत बारस्कर यांचे आवाहन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : केंद्र सरकारच्या पथकामार्फत शहरात होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी व नागरिकांनी स्वच्छतेचे मोबाईल ॲप डाउनलोडिंग करण्यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी दक्ष रहावे. स्वच्छता ॲप डाउनलोड करून कचऱ्याबाबत, स्वच्छता गृहांबाबत आपल्या परिसरातील समस्या, तक्रारीची माहिती ॲपवर टाकावी. स्वच्छता ॲपच्या वापरासाठीही महापालिकेला गुण दिले जाणार आहेत. ॲपवरील तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता ॲप डाउनलोड करावे असे आवाहन नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.

ॲप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा  

Post a Comment

Previous Post Next Post