एएमसी मिरर वेब टीम
पिंपरी : ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन अग्निशामक जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. या मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण गाडले गेले आहेत. ही घटना दापोडी येथे रविवारी सायंकाळी घडली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेज लाइनसाठी एक खड्डा खोदला आहे. या वीस फूट खोल खड्ड्यात एक मुलगा पडला असल्याची माहिती रविवारी सायंकाळी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
खड्ड्यात पडलेल्या माणसाला वर काढत असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. यामध्ये खड्ड्यात पडलेल्या मुलासह अग्निशामक दलाचे दोन जवान गाडले गेले आहेत. या जवानांच्या बचावासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच एनडीआरएफचे एक पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
Post a Comment