'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही असे वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनाही आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत, असं रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post