'जिथे भाजपाची सत्ता, तिथेच दंगली घडल्या'


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) या कायद्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर, मोहम्मद अली जिना यांच्या विचारांचा देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करत आहेत. आम्हाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेला हिंदुस्थान घडवायचा आहे. जिथे नागरिकांची ओळख जाती, धर्मावरून होणार नाही. आम्हाला सर्वधर्म समभावाचा हिंदुस्थान हवा आहे, संघीस्तान नको, असं सांगत विद्यार्थी नेता उमद खालीद याने मोदी सरकारवर टीका केली. सीएए आणि एनआरसी कायद्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. मात्र, ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याच ठिकाणी दंगल घडविण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. कायद्याच्या विरोधात पुण्यातही मोर्चा काढण्यात आला. कुल जमाते तंजीम या संस्थेकडून मुस्लीम समुदायाचा गोळीबार मैदान ते कौन्सिल भवन पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ४० ते ५० हजार नागरिक सहभागी झाले. सीएए आणि एनआरसी विरोधातला पुण्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असल्याचं सहभागींनी म्हटलं. या मोर्चात जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी हर्ष मंगल, निरज जैन आदी उपस्थित होते.

मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसमोर बोलताना खालीद म्हणाला, मागील महिनाभरात केंद्र सरकारच्या सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आवाज उठविणार्‍या अनेक तरुणांच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे चुकीच्या धोरणात आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास, आवाज दाबण्याचं काम केले जात आहे. एक प्रकारे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. या अशा विचारधारांविरोधात देशातील तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं आवाहन त्यानं केलं.

सीएए आणि एनआरसी कायद्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. मात्र, ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याच ठिकाणी दंगल घडविण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे. यातून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम केले गेले. आम्ही या देशात जन्मलो आणि याच देशाचे नागरिक आहोत हे दाखवायची गरज आम्हाला नसून, भारतीय संविधानचा आधार राखतो, असा इशारा उमर खालीदनं यावेळी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post