हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच शिक्षा द्या; उन्नाव पीडितेच्या वडिलांची मागणी


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींप्रमाणे माझ्या मुलीच्या आरोपींना शिक्षा द्या, अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितीच्या वडिलांनी केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री ११.४० च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, आपल्याला मुलीच्या मृत्यूची सुचना देण्यात आली नव्हती, असंही तिच्या वडिलांकडून सांगण्यात आलं. तसंच आरोपींना हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच शिक्षा देणअयात यावी किंवा त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल, असंही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post