उन्नाव बलात्कार प्रकरण: भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर दोषीएएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हा निकाल दिला आहे. १९ डिसेंबरला त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. शशी सिंह या अन्य आरोपीची न्यायलयाने सुटका केली.
कुलदीप सिंह सेंगरची भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर्षी २८ जुलैला बलात्कार पीडितेच्या कारला अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने ती यातून बचावली.
Unnao rape and kidnapping case: Former BJP MLA Kuldeep Singh Sengar has been convicted by Delhi's Tis Hazari court. pic.twitter.com/nTl6O0fMOm
— ANI (@ANI) December 16, 2019
इन कॅमेरा या खटल्याची सुनावणी घेण्यात आली. बलात्कार पीडितेची जबानी नोंदवण्यासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातही विशेष सुनावणी घेण्यात आली. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते.

Post a Comment

Previous Post Next Post