उन्नाव बलात्कार प्रकारातील पीडितेला पेटविले


एएमसी मिरर वेब टीम 
लखनऊ : हैदराबादेत तरुण डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना उन्नाव येथे जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला गुरुवारी सकाळी जिवंत पेटवले. पीडिता 90 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला तातडीने उपचारासाठी लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे उन्नाव पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना आहे. पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी ती पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडिता गंभीर भाजली गेली आहे. पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान शुभम आणि शिवम बलात्कार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post