..तर भस्मसात व्हाल! डॉ. अमोल कोल्हेंचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्याचे आराध्य दैवत आणि सळसळत्या चैतन्याचा झरा असलेल्या छत्रपती शिवरायांची तुलना थेट पीएम मोदींशी करणारे पुस्तक भाजपकडून प्रकाशित झाल्याने चांगलेच रणकंदन माजले आहे. आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकाने भाजपला राज्यातील शिवप्रेमी जनतेकडून चांगलेच रोषाला सामोरे जावे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुस्तकावरून खणखणीत इशारा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करून पुस्तकावरून प्रतिक्रिया दिली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, की एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. परंतु, ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे, पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल!

छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत. कैक जन्म घेतले, तरी त्यांची तुलना नाही. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे...याचं भान ठेवा ...नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!

Post a Comment

Previous Post Next Post