'बाहेरून शिवसेनेत आलेल्यांना अॅडजेस्ट व्हायला वेळ लागेल'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज, शनिवारी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तारांनी राजीनामा का दिला अद्याप समजले नाही. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही, हे फक्त मुख्यमंत्री किंवा राजभवनाची सुत्रे सांगतील. पण ते नाराज का आहेत माहित नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्री करून सन्मान केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यात जास्त मंत्रिपदे आलेली नाहीत. त्यामुळे सर्वांना अॅडजेस्ट करावे लागते.

बाहेरून शिवसेनेत आलेल्यांना अॅडजेस्ट व्हायला वेळ लागेल. जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत, असा खोचक टोला राऊत यांनी नाराजांना लगावला आहे. राजीनाम्यानंतर शिवसेनेकडून सत्तारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची अब्दुल सत्तर यांच्यासोबत बैठक सुरू आहे. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नसल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post