डॉ. बाळ बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे "सकाळ'चे कार्यकारी संपादक तथा अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना आदर्श पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी ही घोषणा केली. मंगळवारी (चार फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील पद्मावती परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण होईल. सन्मानचिन्ह, शाल व तुळशी वृंदावन, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. बोठे पाटील यांचा वृत्तपत्र छायाचित्रकार, बातमीदार ते संपादक, असा दोन तपांचा प्रवास पत्रकारितेसह विविध क्षेत्रांतील मंडळींना प्रेरणादायी आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, कायदा, कृषी आदी क्षेत्रांतही डॉ. बोठे पाटील यांचे उल्लेखनीय योगदान आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन डॉ. बोठे पाटील यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post